नागपुरात गुंडाराज, दुकानदाराच्या हत्येचा थरार कॅमेर्‍यात कैद

March 10, 2015 7:46 PM1 commentViews:

napur attack10 मार्च : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नागपूरमध्ये गुंडाराजचं चित्र पाहण्यास मिळालंय. शनिवारी सीताबर्डीच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये भर दिवसा दोन गुंडांनी दुकानात घुसून व्यापार्‍यावर प्राणघातक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात जखमी झालेल्या भारत खटवानी यांचा आज मृत्यू झालाय. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय.

नागपूर शहरातील सीताबर्डी इथल्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये भारत खटवानी यांचं मोबाईल विक्रीचं दुकान आहे. खंडणी दिली नाही म्हणून शनिवारी दोन गुंडांनी दुकानात घुसून खटवानी यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. धक्कादायक म्हणजे दुकानात ग्राहक असताना गुंडांनी हा हल्ला केला होता. खटवानी प्राण वाचवण्यासाठी गुंडांना प्रतिकार करत होते पण, उभे असलेल्या ग्राहकांनी मदत करण्याऐवजी दुकानातून पळ काढला. जवळपास मिनिट भर चालेला या हल्ल्याचा थरार कॅमेर्‍यात कैद झालाय. खटवानी यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज दुकानदारांनी इलेक्ट्रॉनिक्स मार्केट बंद ठेवलं. भाजपच्या वतीने या घटनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरात संताप आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Susheel Jain

    The government is responsible for this failure.

close