‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चा वर्ल्ड रेकॉर्ड

September 28, 2009 11:45 AM0 commentsViews: 3

28 सप्टेंबर 'कुटुंब रंगलय काव्यात' या कार्यक्रमाद्वारे काव्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले विसुभाऊ बापट यांनी सोमवारी वर्ल्ड रेकॉर्ड केला. रविवारी सकाळी साडे आठ ते साडे बारा पर्यंत त्यांनी 15 तास काव्यवाचन करून हा वर्ल्ड रेकॉर्ड केला. 'कुटुंब रंगलय काव्यात' या कार्यक्रमाच्या 2000 व्या प्रयोगाच्या निमित्तानं त्यांनी हा विक्रम केला. लवकरच त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. हा रेकॉर्ड करताना त्यांनी अपरिचीत कवींच्या कविता सादर केल्या. खर्‍या अर्थानं त्यांनी मराठीचा झेंडा अटके पार नेला आहे.

close