सिंचनावर तब्बल 72 हजार कोटी खर्च पण,क्षमता फक्त 17 टक्के !

March 10, 2015 10:54 PM1 commentViews:

maharashtra irrigation410 मार्च : ‘रखडलेला महाराष्ट्र’ या अभियानांतर्गंत आज आपण सिंचन क्षेत्रातल्या सद्यस्थितीचा धांडोळा घेणार आहोत. आपल्याला राज्यात सध्या सुरू असलेले सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करायचे झाल्यास किमान 77 हजार कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. आयबीएन लोकमतचा विशेष वृत्तांत…

महाराष्ट्राच्या सिंचनावर आजवर तब्बल 72 हजार कोटी खर्च झाले आहेत. पण, सिंचनाची क्षमता विचाराल अवघी 17 टक्के…या विरोधाभासी आकडेवरूनच महाराष्ट्राच्या सिंचनाची राज्यकर्त्यांनी कशी वाट लावलीये हे स्पष्ट होतंय. केवळ आपल्या मतदारसंघात एखादातरी मोठा सिंचन प्रकल्प पाहिजे म्हणूनच नेतेमंडळींनी मध्यंतरीच्या काळात सिंचन प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नुसताच धडाका लावला होता. हा सगळा कारभार अर्थातच पूर्णतः नियोजन शुन्य होता. म्हणूनच आज महाराष्ट्राच्या सिंचन क्षेत्राची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी बनून गेलीय…आता तुम्ही म्हणाल कशी…तर मग जरा या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूयात…

सिंचन प्रकल्पांची स्थिती

सुरू असलेले सिंचन प्रकल्प
780
मोठे प्रकल्प
81
मध्यम प्रकल्प
122
लघु पाटबंधारे प्रकल्प
577
पूर्णतेच्या अंतिम टप्प्यातील प्रकल्प
421
अपूर्ण प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता
2500 कोटी रु.
10 ते 15% काम पूर्ण झालेले प्रकल्प
110
प्राथमिक अवस्थेमधील प्रकल्प रद्द केल्यास
70 टक्के निधीची बचत होईल

सर्व प्रकल्पांसाठी अपेक्षित खर्च
77, 455 कोटी रु.

या आकडेवारीनुसार राज्यातले सर्व सिंचन प्रकल्प तातडीने प्रकल्प पूर्ण करायचे झाल्यास सरकारला किमान 77, 455 कोटी रुपयांचा निधी उभा करावा लागणार आहे आणि एवढा निधी उभा करण्याची सरकारकडे ना ऐपत आणि ना पत आहे. हे एक ढळढळीत सत्य आता सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच सरकारने आगामी बजेटमध्ये अंतिम टप्प्यात असलेल्या 421 सिंचन प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करून त्यासाठी आवश्यक असलेले अडीच हजार कोटी जरी उपलब्ध करून दिले तरी खूप झाले. बघुयात या बजेटमध्ये तरी राज्य सरकार रखडलेल्या सिंचन क्षेत्राला पुन्हा ऊर्जितावस्था मिळवून देतंय का ते…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Shrikant Patil

    Most terrific corruption- Irrigation dept

close