‘सोलार इम्पल्स’ भारतात…

March 11, 2015 12:13 PM0 commentsViews:

जगातील पहिले सौर ऊर्जेवर उडणारे पॉवर्ड प्लेन सोलर ‘इंपल्स-टू’ अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर मंगळवारी रात्री लँड झाले. सोमवारी सकाळी दुबईहून या विमानाने उड्डाण केले होते. हे विमान सध्या ‘वर्ल्ड टूर’वर निघालं आहे. अहमदाबादनंतर हे विमान वाराणसीला जाणार आहे. भारत, म्यानमार, हवाई, चीन, न्यूयॉर्क मार्गे विमान परत अबूधाबीला परतणार आहे. गेल्या वर्षीएप्रिलमध्ये हे विमान जगासमोर आणलं गेलं होतं आणि स्वित्झर्लंडमध्ये जून महिन्यात त्याची पहिली यशस्वी चाचणी झाली होती.

काय आहे वैशिष्ट्य
विमानाची बॉडी कार्बन फायबरने बनवलेली आहे. डायनोमध्ये 17,248 बॅटरी लावण्यात आल्यामुळे विमानाला उडण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. डायनोचा आकार 72 मीटर इतका असून एखाद्या बोइंग 747 पेक्षा हा डायनो मोठा आहे. डायनोचे वजन जवळपास 2300 किलो आहे. सौर ऊर्जेवर चालणारे हे विमान रात्री देखील उड्डाण करु शकते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close