शरद पवारांना व्हायचंय सत्तेच्या राजकारणापासून दूर

September 28, 2009 2:19 PM0 commentsViews: 3

28 सप्टेंबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवृत्तीचे वेध लागलेत. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना दिलेल्या दिलखुलास मुलाखतीत त्यांनी मान्य केलं की, त्यांचा हल्लीच्या तरुण पिढीशी संवाद कमी होत चालला आहे. पवारांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. दाऊद इब्राहिम, पुलोदची आघाडी आणि सत्तेच्या राजकारणातली निवृत्ती या विषयी त्यांनी पहिल्यांदाच या मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे, शरद पवारांच्या मुलाखतीचा पहिला भाग तुम्ही बघू शकता मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता.

close