बस स्थानकासाठी 3 कोटी रुपये खर्चूनही मुलभूत सोयीसुविधांचा अभाव!

March 11, 2015 11:46 AM0 commentsViews:

11 मार्च :  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लेखी पंढरपूरातील बस स्थानक अव्वल क्रमांकावर आहे. 2009 मध्ये 14000 चौरस मीटर क्षेत्रफळावर तीन कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलंय. या बस स्थानकात दररोज अकराशेहून अधिक बसेसची वर्दळ असते. जवळपास 60 ते 70 हजार प्रवासी या बस स्थानकाहून प्रवास करत असतात. यात्रेच्या काळात तर हा आकडा लाखाच्या घरात जातो. पण प्रवाशांची रोजची संख्या आणि बस स्थानकात उपलब्ध असलेल्या सुविधा पाहता, त्या अतिशय तुटपुंज्या असल्याचे पाहायला मिळते. बस स्थानकाची उभारणीच मुळ व्यापार्‍यांच्या सोयीने केल्याने प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसाच्या संकटांचा सामना करावा लागतो. मुलभूत सोयीसुविधांचा फज्जा उडालेल्या या बस स्थानकाचा IBN लोकमतने घेतलेला हा आढावा…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close