राणे समर्थकांवरील गुन्हे प्रकरणात पोलीस अधिकारी निर्मल यांची बदली

September 29, 2009 8:59 AM0 commentsViews: 3

29 सप्टेंबर कणकवलीचे एपीआय निर्मल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. रविवारी रात्री साडेबारा वाजता त्यांची बदली करण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार मारहाण झाली होती. या प्रकरणी 24 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांनतर काही तासातच ही बदली झाली आहे. आत्तापर्यंत 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ऐन निवडणुकीच्या कालावधीत कणकवलीत हे प्रकार पुन्हा एकदा सुरु झाल्याने कणकवलीतला तणाव वाढला होता.त्यावर निर्मल यांनी ताबडतोब कारवाई करून संबधितांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी दबावाला बळी पडून निर्मल यांची तडकाफडकी बदली केली.

close