पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामधली मॅच रद्द

September 29, 2009 9:07 AM0 commentsViews: 5

29 सप्टेंबर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची मॅच काल पावसामुळे रद्द झाली. त्यामुळे सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या भारतीय टीमच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. 43 व्या ओव्हरमध्येच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस न थांबल्यामुळे मॅच रद्द करावी लागली. सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय टीमला आता वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच जिंकावीच लागेल. तिही मोठ्या फरकाने तरीही पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या मॅचच्या निकालावर टीम इंडियाचा सेमी फायनल प्रवेश अवलंबून असेल.

close