10 कोटी वर्षांपूर्वीचं झाड

March 11, 2015 4:40 PM0 commentsViews:

11 मार्च : महाराष्ट्रात आता आपल्याला लवकरच जीवाश्म पार्क बघण्याची संधी मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात महाराष्ट्र तेलंगाणा राज्याच्या सीमेवर असलेल्या जंगलात दहा कोटी वर्षांपूर्वीचे दगड सापडले आहेत. पूर्वीच्या झाडांचं रुपांतर दगडात झाल्याचं स्पष्ट झालंय. वडदम जंगलात एकाच ठिकाणी अशी दगड झालेली पंधरा ते वीस झाडं आढळली. त्यानंतर वनविभागानं याठिकाणी जीवाश्म पार्क उभारायला सुरुवात केली. राज्यातलं हे पहिलं जीवाश्म पार्क असणार आहे. याठिकाणी आता पर्यटकांची रेलचेल सुरू झालीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close