महाराष्ट्र परिवहन विभागाची अवस्था खिळखिळी !

March 11, 2015 5:44 PM0 commentsViews:

11 मार्च : राज्यातल्या अनेक बस स्थानकांची अवस्था अत्यंत बकाल आहे. स्वच्छतागृह नसल्यामुळे प्रवाशांना उघड्यावरच लघुशंका करावी लागते. महिलांसाठी तर अनेक समस्या आहेत. महाराष्ट्र परिवहन विभागाची अवस्था एसटी बस सारखी खिळखिळी झालीय. गेल्या वर्षभरापासून एकही नवीन बस महाराष्ट्रातील तीन्ही विभागीय कार्यशाळेतून बाहेर पडली नाही. तीन्ही कार्यशाळेत जुन्याच गाड्या नविन करण्याचं काम सुरू आहे. नविन चेसिस आल्या नाहीत म्हणून नविन गाड्या बांधणी नाही…तर काही नविन गाड्यांना सीट बसवल्या नसल्यानं अनेक गाड्या कार्यशाळेत अडकून पडल्यात..औरंगाबादेतील विभागीय कार्यशाळेचा आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी….

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close