‘आप’मध्ये ‘टेप’स्फोट, केजरीवालांवर फोडाफोडीचा आरोप

March 11, 2015 6:46 PM0 commentsViews:

kejriwal tape311 मार्च : आम आदमी पार्टीमधील अंतर्गत संघर्ष चांगलेच चव्हाट्यावर आले आहेत. आता तर खुद्द अरविंद केजरीवाल यांच्यावरच घोडेबाजार केल्याचा गंभीर आरोप ‘आप’चे माजी आमदार राजेश गर्ग यांनी केलाय. आणि त्यासाठीचा पुरावा म्हणून त्यांनी एक रेकॉर्डिंग सादर केलंय. या रेकॉर्डिंगमध्ये गेल्या वर्षीचा केजरीवाल आणि गर्ग यांच्यामधला संवाद आहे. अरविंद केजरीवाल हे काँग्रेसचे आमदार फोडण्याच्या प्रयत्नांत होते, असा आरोप गर्ग यांनी केलाय.

मागील वर्षी दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमतासाठी मोठा पेच निर्माण झाला होता. सत्ता स्थापनेसाठी आप आणि भाजपला आवाहन करण्यात आलं होतं. पण भाजपने नकार दिल्यामुळे आपने सत्ता स्थापनेसाठी हालचाल सुरू केली होती. आपला पाठिंब्याची गरज होती. त्यावेळी केजरीवाल यांनी काँग्रेसच्या आठ आमदारांपैकी सहा आमदार फोडण्याची सुचना गर्ग यांना केली होती. सहा आमदार फोडून नवीन पक्ष स्थापन करून ‘आप’ला पाठिंबा देण्याची रणनीती केजरीवाल यांनी मांडली होती. एवढंच नाहीतर काँग्रेसचे हे सहा आमदार भाजपमध्ये जाणार होते. पण त्यातील 3 मुस्लीम आमदार असल्यामुळे तसं होणार नाही. त्या सहाही आमदारांना फोडून आपल्या पक्षाला पाठिंबा घेता येईल असा दावाही केजरीवाल यांनी केला होता. दरम्यान, राजेश गर्ग यांनी दिलेल्या या रेकॉर्डिंगचा हवाला देत अंजली दमानियांनी पक्षाला रामराम ठोकलाय. ‘आप’मध्ये ‘डर्टी पॉलिटिक्स’ होत असल्याचा आरोप दमानियांनी केला. तर ही टेप खोटी आहे असा दावा आपचे नेते आशुतोष यांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close