नारायण राणे पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात ?

March 11, 2015 7:34 PM1 commentViews:

rane bandara election11 मार्च : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने वेगळा मार्ग काढलाय. काँग्रेसने आता त्यांना वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक लढवण्यासाठी विचारणा केली आहे. एकीकडे राणे बंडाच्या पावित्र्यात असतानाच काँग्रेसनं त्यांना हा प्रस्ताव दिला आहे. शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण आणि मुंबईच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांच्या निवडीवरून नारायण राणे पुन्हा एकदा नाराज झाले. आठवड्याभराच्या नाराजीनाट्यानंतर काँग्रेसने राणेंसाठी एक ऑफर देऊ केलीये. वांद्रेमधील पोटनिवडणूक लढवण्यासाठी राणेंना विचारणा करण्यात आलीये. विशेष म्हणजे वांद्र पूर्व हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. राणेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून वारंवार सेनेतल्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. अशा परिस्थितीत या मतदारसंघातला मतदार राणेंना मतदान करणार का, हा खरा प्रश्न आहे. येत्या 11 एप्रिलला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पण, खरं पाहता एखाद्याच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत त्याच्या जवळच्या व्यक्तीलाच सहानुभूतीचा फायदा होतो असा आतापर्यंतचं चित्र आहे. मग काँग्रेसने अशा जागेवर राणेंना लढण्याचा प्रस्ताव देऊन नेमका काय नेम साधलाय, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • VINOD

    parat rane sahebancha bakra karu pahat aahet congress wale……rane saheb pls maghar ghya he nivadnuk ladhu naka

close