विजेंदरकुमार जागतिक क्रमवारीत नंबर वन

September 29, 2009 10:21 AM0 commentsViews: 1

29 सप्टेंबर भारताचा आघाडीचा बॉक्सर विजेंदर कुमारने 75 किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमधलं पहिलं ब्राँझ मेडल मिळवून देणारा विजेंदर कुमार बॉक्सिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे. बिजिंग ऑलिम्पिकबरोबरच मिलानमध्ये झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्येही विजेंदरनं भारताला पहिलं मेडल मिळवून दिलं होतं. या स्पर्धेत त्यानं ब्राँझ मेडल मिळवून दिलं होतं. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला होता.

close