प्रताप सरनाईकांना रवी पुजारीनी दिली जीवे मारण्याची धमकी

March 11, 2015 8:40 PM0 commentsViews:

pratap sarnaik11 मार्च : ठाण्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने जीवे धमकी दिल्याची धक्कादायक घटना उजेडात आलीये. गेले 10 दिवस आमदार प्रताप सरनाईक यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सतत फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.

प्रताप सरनाईक यांच्या ऑफिसमधील लँडलाईन फोनवर धमकीचे फोन आलेत. या प्रकारानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तांना तक्रार पत्र दिलंय. तसंच फोन कॉलचे रेकॉर्डिंगही पोलिसांना तपासासाठी देण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांनी तपास सुरू केलाय. एवढंच नाहीतर ठाण्याचे पालकमंत्री आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनाही नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात परदेशातून धमकीचे फोन आले होते. गेल्या महिन्याभरात ठाण्यातील अनेक व्यावसायिकांनाही रवी पुजारी गँगने खंडणीसाठी धमकीचे फोन केलेत. ठाण्यात रवी पुजारी गँगच्या वाढत्या धमकी सत्रामुळे कायदा सुवस्थेचा प्रश्नं निर्माण झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close