पुण्यात पोलिसांच्याच मुलांमध्ये गँगवॉर, तरूणी गंभीर जखमी

March 11, 2015 7:47 PM0 commentsViews:

pune gangwar411 मार्च : पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरने डोकंवर काढलंय. पुण्यातल्या बोहरी आळीमध्ये भर दुपारी पूर्व वैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्यानं खळबळ उडाली. याहुन धक्कादायक म्हणजे या गँगवॉरमध्ये पोलिसांचीच मुलं सहभागी होती. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीये.

घडलेली हकीकत अशी की, अजय शिंदे या गुंडावर आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास बोहरी आळीमध्ये गोळीबार करण्यात आलाय. पण, यात अजयची मैत्रीण मेघना हिच्या पोटात गोळी लागल्यानं ती गंभीर जखमी झाली. जवळच्या चौकात गस्तीवरच्या मार्शल्समुळे एक आरोपी नवनाथ लोधा याला पकडण्यात पोलिसांना यश आलं. या प्रकरणात एकूण 5 आरोपी असल्याचं तसंच अजय शिंदे आणि नवनाथ लोधा ही दोघंही पोलीस कर्मचार्‍यांची मुलं असल्याचं समोर आलंय. तसंच ही दोघंही गुंड पूर्वी स्वारगेट पोलीस लाईनमध्ये रहात असल्याचं निष्पन्न झालंय. काही महिन्यांपूर्वी स्वारगेटजवळ कुणाल पोळ याचा खून झाला होता, त्या प्रकरणाचा आजच्या घटनेशी संबंध असल्याचंही पोलीस तपासात पुढं आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close