एअर इंडियाच्या वैमानिकांचा संप चिघळला

September 29, 2009 10:26 AM0 commentsViews: 5

29 सप्टेंबर एअर इंडिया मॅनेजमेंटला अजूनही संपावर तोडगा मिळालेला नाही. मंगळवारी संपाच्या चौथ्या दिवशी सुमारे सहाशे पायलटस्‌नी संपात सहभागी होण्याचा इशारा दिला. एअर इंडियाचे अध्यक्ष अरविंद जाधव आणि इतर एअरलाईन्सचे प्रतिनिधी यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सचिवांची मंगळवारी भेट घेतली. प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ असं एअर इंडिया मॅनेजमेंटनं म्हटलं आहे. कर्मचार्‍यांच्या हिताचा विचार कंपनी करतेच आहे. पण, त्याचबरोबर कंपनीची आर्थिक स्थिती पाहता कॉस्ट कटिंगचाही विचार करणं भाग असल्याचं अरविंद जाधव यांचं म्हणंणं आहे. एअर इंडियाच्या देशभरातून एकूण 45 फ्लाईटस् रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईहून सुटणार्‍या 6 इंटरनॅशनल फ्लाईटस् आणि 8 डोमेस्टिक फ्लाईटस् आहेत. एअर इंडियाच्या प्रवाशांना इतर एअरलाईन्सनी विमानसेवा पुरवावी अशी सूचना मंत्रालयाने केली आहे. एअर इंडियाला फ्लाईटस् रद्द झाल्यामुळे गेल्या तीन दिवसात सुमारे 84 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

close