बोगस रेशनकार्ड प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्याची चौकशी

September 29, 2009 1:18 PM0 commentsViews: 2

29 सप्टेंबर बोगस रेशन कार्डासंदर्भात गिरीश धानोरकर या मनसे कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. मंुबईतल्या शिवाजी पार्क पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. रेशनकार्ड हा मतदानासाठी ग्राह्य पुरावा मानू नये, अशी याचिका मनसेनं महिन्याभरापूर्वी हायकोर्टात दाखल केली होती. याचिकाकर्ता संदीप देशपांडे यांनी याचिकेबरोबर पुरावा म्हणून मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांचं बोगस रेशनकार्ड कोर्टात सादर केलं होतं. हे रेशनकार्ड कुरीयरनं मिळाल्याचं मनसेनं सांगितलं. याप्रकरणी चौकशीचे आदेश कोर्टानं पोलिसांना दिले होते. अधिक तपासानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं, त्या व्यक्तीच्या चौकशीतून मनसे कार्यकर्ता गिरीश धानोरकरचं नाव पुढे आलं. यासंदर्भात आता धानोरकरची चौकशी सुरू आहे. चौकशी नंतर पोलिसांना हा अहवाल हाय कोर्टत सादर करायचा आहे.

close