डोंबिवलीत 5 दिवसांच्या चिमुकलीला दुसर्‍या मजल्यावरुन फेकलं

March 12, 2015 1:36 PM0 commentsViews:

Dombivli

12 मार्च :  पाच दिवसांच्या चिमुकलीला रुग्णालयाच्या दुसर्‍या माळ्यावरुन खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत आज सकाळी 8 वाजता च्या सुमरास घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील शुभदा नर्सिंग होममध्ये ही घटना घडली आहे.

सुजाता गायकवाड यांनी 5 दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. मुलीची आई सकाळी बाथरूम अज्ञाताने मुलीला पाळण्यातून उचललं आणि इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरुन फेकून दिले.

या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिस तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close