हेलिकॉप्टर मध्ये बिघाड : पवारांची आष्टीची सभा रद्द

September 29, 2009 1:23 PM0 commentsViews: 2

29 सप्टेंबर हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आपली बीडमधल्या आष्टीतली सभा रद्द करावी लागली. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातली सभा आटोपून पवार कोपरगावच्या सभेला गेले. त्यानंतर त्यांना बीडमधल्या आष्टीतल्या सभेसाठी जायचं होतं. मात्र पायलटनं हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगितलं. त्यामुळे पवारांना आष्टीची सभा रद्द करून औरंगाबादला कारनं जावं लागलं.

close