सह्याद्रीत निसर्गाची रंगपंचमी

March 12, 2015 2:17 PM0 commentsViews:

सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये सध्या निसर्गाचा रंगोत्सव पहायला मिळतोय. वृक्षांची पानगळ सुरू झाल्यामुळे उघडे-बोडके डोंगर दिसतात, पण त्यामध्येही नेत्रसुखद अशा रंगीबेरंगी फुलांच्या साजामुळे डोळ्यांची पारणे फिटतात. माळशेज आणि किल्ले शिवनेरी परिसरात ही रंगोत्सव फुलला आहे. यात लालचुटूक काटेसावर, पांगारा, पांढराशुभ्र चाफा आणि पिवळाधमक बहावा या फुलांनी येणार्‍याजाणार्‍यांचं मन मोहून जातंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close