क्रेडिट कार्ड डिफॉल्टर्स बाबत ICICI ची कडक भूमिका

September 29, 2009 2:08 PM0 commentsViews: 7

29 सप्टेंबर क्रेडिट कार्ड डिफॉल्टर्स म्हणजे क्रेडिट कार्डची थकबाकी न चुकवणार्‍या ग्राहकांना रोखण्यासाठी आता ICICI बँक कडक पावलं उचलणार आहे. त्यासाठी बँकेच्या नियमात काही बदल करण्यात येतील अशी शक्यता आहे. कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट कार्डमध्ये ग्राहक डिफॉल्टर ठरल्यावर त्याच्या ICICI बँकेच्या इतर प्रकारच्या क्रेडिट कार्डांनादेखील ब्लॉक केलं जाईल. थकबाकीची रक्कम पूर्ण चुकती होईपर्यंत त्याच्या कार्डावरील खरेदीची सुविधा बंद ठेवण्यात येईल. हे नियम पाच ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. सिटी बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत हे नियम पूर्वीपासूनच लागू झाले आहेत. >>

close