मन्ना डे यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

September 30, 2009 8:01 AM0 commentsViews: 27

30 सप्टेंबर ज्येष्ठ पार्श्वगायक मन्ना डे यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी साडेतीन हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश यांच्यासोबत सहगायनही त्यांनी केलं आहे. 1950 ते 70चं दशक गाजवलं. त्यांनी बंगाली आणि हिंदी भाषेतून गाणी गायली आहेत. मन्ना डेंना यापूर्वी पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे. मन्ना डेंच अभिनंदन करताना त्यांना पुरस्कार मिळायला उशीर झाल्याची खंत ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांनी व्यक्त केली आहे.

close