आष्टीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाटले पैसे

September 30, 2009 8:25 AM0 commentsViews: 134

30 सप्टेंबर बीड जिल्ह्यातल्या आष्टी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी जामखेड आष्टी भागात पैशाचं खुलेआम वाटप केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आष्टी इथे सभा होती. या सभेला आलेल्या लोकांना सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी 500 रुपयांच्या नोटा वाटल्या. सभेसाठी आलेल्या काही जीपचालक आणि गाडीतील कार्यकर्त्यांना नोटा वाटण्यात आल्या. आयबीएन-लोकमतचे सिनियर रिपोर्टर आशिष जाधव यांनी या घटनेचे व्हिडिओ शुटिंग घेतलं. यावेळी आशिष जाधव यांना धस यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीही केली. भाजपाचे उमेदवाराने पैसे वाटल्याची तक्रार दाखल केली आहे.

close