शिवाजीराव देशमुखांविरोधात राष्ट्रवादीने आणला अविश्वास ठराव

March 12, 2015 4:24 PM0 commentsViews:

vidhan12 मार्च : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने अविश्वास ठराव आणलाय. या ठरावावर सोमवारी चर्चा होणार आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. पण, सभापती पद काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीनं आता सभापती पदावर दावा सांगितलाय.

त्यामुळेच शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणलाय. यानिमित्ताने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहे. शिवाजीराव देशमुख यांनी राजीनामा नाही दिला तर वेळापत्रकानुसार मध्यंतर नंतर सभापतींविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणला जाईल.

तेव्हा हा ठराव वाचून दाखवला जाईल. त्यावर 10 जणांनी उभं राहून अनुमोदन दिलं तर तो सभागृहात स्वीकारला जातोय. त्यानंतर पुढच्या 7 दिवसांच्या आत यावर चर्चा होऊन खुले मतदान होणार आहे.

विधान परिषदेत संख्याबळ कसं आहे ?
राष्ट्रवादी काँग्रेस 28
काँग्रेस 21
भाजप 12
शिवसेना 7
लोकभारती 1
शेकाप 1
RPI कवाडे 1
अपक्ष 7

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close