गारपीटग्रस्तांसाठीच 4 हजार कोटीचं पॅकेज गेलं कुठे ?

March 12, 2015 10:03 PM1 commentViews:

Gara12 मार्च : अवकाळी आणि गारपीटग्रस्तांना सरकारने आतापर्यंत 4 हजार कोटींची मदत दिल्याचा दावा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात केलाय. पण प्रत्यक्षात ही मदत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अजूनही पोहोचलेली नाहीये असा आरोप विरोधकांनी केलाय. म्हणूनच मग सरकारने देऊ केलेली ही 4 हजार कोटीचं पॅकेज नेमकं गेलं कुठे ?, असा सवाल उपस्थित होतोय.

4 हजार कोटींचं पॅकेज गेलं कुठं ?, नागपूरचं अधिवेशन सुरू असतानाच अवकाळी गारपिटीने राज्याला झोडपल्यानंतर सरकारने त्याच अधिवेशनात पीडित शेतकर्‍यांना 4 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि ही मदत शेतकर्‍यांना मिळाल्याचाही दावा राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी केलाय. सरकार म्हणतंय, 4 हजार कोटी दिले! एकनाथ खडसे कितीही दावा करत असले तरी प्रत्यक्षात हे 4 हजार कोटीचं पॅकेज शेतकर्‍यांपर्यंत अजूनही पोहोचलेलंच नाहीये. किंबहुना शेतकर्‍यांच्या खात्यात नेमकी किती रक्कम आजवर जमा झालीय, याची आकडेवारीच सरकारकडे उपलब्ध नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

सरकार म्हणतंय 4 हजार कोटी दिलेत…तर विरोधक म्हणताहेत मदत मिळालीच नाही..मग हे 4 हजार कोटी नेमकं गेले तरी कुठे हा प्रश्न निर्माण होतोय. म्हणूनच मध्यतरी IBN लोकमत देखील थेट शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पॅकेज गेलं कुठे ? या संबंधी राज्यभर पाहणी सर्वेक्षण केलं होतंं. पण त्यातही बहुतांश शेतकर्‍यांना ही शासकीय आर्थिक मदत मिळालीच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय.म्हणूनच मग आता हे शेतकर्‍यांना हक्काच्या मदतीपासून वंचित ठेवणारे हे झारीतले शुक्राचार्य नेमके आहे तरी कोण हे शोधून काढण्याची जबाबदारी फडणवीस सरकारवर येऊन पडलीय. कारण यापूर्वीच्या नुकसानीची मदत हातात पडली नसतानाच अवकाळीने पुन्हा एकदा बळीराजाला झोडपून काढत हाता तोंडाशी आलेली पीकंही भुईसपाट केलीत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Meena Paes

    Will the information you have found out remain only a news? As it was before,so also it is now and forever. Everybody makes a noise and forget it conveniently. The farmer goes on committing suicide.

close