मुलुंडमध्ये रेल्वेच्या पादचारी पुलाचा भाग कोसळला, जीवितहानी नाही

March 12, 2015 11:44 PM0 commentsViews:

mulund bridgमुंबई (12 मार्च): मुलुंडमध्ये गुरुवारी रात्री रेल्वेच्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडलीये. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या पुलाचा काही भाग हा शौचालयावर पडला. जर हा भाग चालत्या ट्रेन वर पडला असता तर मात्र मोठी दुर्घटना सुद्धा घडली असती.  मुलुंड पूर्व आणि पश्चिम दिशेस जोडणारा हा पुला आहे. हा पुल जूना झाला असून याला काही ठिकाणी तडे सुद्धा गेलेले आहेत.

याबाबत स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकड़े तक्रारी सुद्धा केल्या होत्या पण याकड़े रेल्वे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केलं. पुलाचा भाग कोसळल्यावर मात्र रहदारी बंद करण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close