भूसंपादन कायद्यासंदर्भात अण्णांनी लिहलं केंद्र सरकारला पत्र

March 13, 2015 9:26 AM0 commentsViews:

anna-modi

13 मार्च :  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भूसंपादन कायद्यासंदर्भात आता थेट केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये अण्णांनी अनेक मागण्या केलेल्या आहेत.

अण्णांनी या पत्राद्वारे केंद्र सरकारला शेत जमिनीचं वगच्करण करुन बागायती शेती अधिग्रहीत करु नये, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव द्यावा, कृषी आयोगाची स्थापना करावी, नदीकाठची सुपीक जमीन उद्योगधंद्यांसाठी देऊ नये, यासारख्या मागण्या केल्या आहेत.

त्याशिवाय, अण्णांनी आपल्या पत्रामधून सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. आतापर्यंत कोणतचं सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी संवेदनशील नसल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमी अधिग्रहण कायद्यातून शेतकर्‍यांं वरील अन्याय दूर केला तर मन की बातचं आम्ही स्वागत करु,असंही अण्णांनी म्हटलं आहे.

अण्णांच्या पत्रातील प्रमुख मागण्या

  • शेत जमिनीचं वगच्करण करुन बागायती शेती अधिग्रहीत करु नये
  • शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव द्यावा
  • कृषी आयोगाची स्थापना करावी
  • नदीकाठची सुपीक जमीन उद्योगधंद्यांसाठी देऊ नये

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close