किवीजचा बांगलादेशवर विजय, क्वार्टरफायनलमध्ये भारत-बांगलादेश आमनेसामने

March 13, 2015 5:07 PM0 commentsViews:

nz vs bangala13 मार्च : वर्ल्ड कपमध्ये क्वार्टरफायनलमध्ये टीम इंडियाचा मुकाबला आता बांगलादेशशी होणार हे स्पष्ट झालंय. आज वर्ल्ड कपमध्ये अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशचा 3 विकेटनं पराभव केलाय. या निकालावरुन क्वार्टरफायनलची मॅच स्पष्ट झालीये. सख्खे शेजारी असलेले भारत आणि बांगलादेश क्वार्टरफायनलमध्ये भिडणार आहे.

टॉस जिंकून न्यूझीलंडनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण आज त्यांच्या बॉलर्सना वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच चोप बसला. सौम्या सरकारची तुफान हाफ सेंच्युरी आणि महमदुल्लाहच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर बांगलादेशनं न्यूझीलंडच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. सौम्या सरकारनं 51 तर महमदुल्लाहनं 128 रन्स ठोकले. त्यानंतर तळाला आलेल्या साब्बीर रहमाननं 40 रन्सची फटकेबाजी करत न्यूझीलंडसमोर 289 रन्सचं टार्गेट उभारलं. न्यूझीलंडतर्फे बोल्ट, अँडरसन आणि इलियॉटनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 289 रन्सचा पाठलाग करणार्‍या न्यूझीलंडच्या इनिंगची सुरुवात खराब झाली. ब्रँडन मॅकलम आणि केन विल्यमसन झटपट आऊट झाले. पण मार्टिन ग्युप्टिलने शानदार सेंच्युरी ठोकत न्यूझीलंडची इनिंग सावरली. त्याला साथ दिली ती रॉस टेलरनं…रॉस टेलरनं फॉर्ममध्ये येत 56 रन्स केले. पण बांगलादेशनंही न्यूझीलंडवर दबाव टाकला शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच रंगली. पण साऊदी आणि डॅनिअल व्हिटोरीनं अखेर न्यूझीलंडला विजय मिळवून दिलाय. आता क्वार्टरफायनलमध्ये भारत आणि बांगलादेश भिडणार हे स्पष्ट झालंय. बांगलादेशची इनिंग पाहता भारताला गाफील राहुन चालणार नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close