एअर इंडियाच्या पायलट्सचा संप मिटला

September 30, 2009 8:42 AM0 commentsViews: 1

30 सप्टेंबर एअर इंडिया पायलट्सचा संप अखेर मिटला. कंपनीचे सीएमडी अरविंद जाधव यांनी दिलेली आश्वासनं आणि सरकारची मध्यस्थी यशस्वी झाली. संप मागे घेत असल्याची घोषणा कॅप्टन भल्ला यांनी केली. येत्या सात तारखेपर्यंत कर्मचार्‍यांना भत्ते देण्यात येणार आहेत. आपला कंपनी मॅनेजमेंट आणि नागरी उड्डाण मंत्र्यांवर विश्वास असून, त्यामुळेच आपण सर्व पायलट्सना कामावर परत यायचं आवाहन करत असल्याचं कॅप्टन व्ही. के. भल्ला यांनी सांगितलं आहे. गेल्या पाच दिवसापासून एअर इंडियाचा संप सुरु असल्याने कंपनीने काही दिवसांकरीता बुकिंगही बंद केलं होतं.

close