नाईटलाईफ सुरू करताय पण महिलांच्या सुरक्षेचं काय ? : हायकोर्ट

March 13, 2015 6:12 PM1 commentViews:

mumbai high court on nighlife13 मार्च : शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मोठा गाजावाज करत नाईटलाईफ सुरू करण्याबद्दल आग्रह धरलाय. राज्य सरकारनेही त्याला संमती दिलीये. मात्र, राज्य सरकारच्या संमतीतून हायकोर्टाने आज हवा काढलीये. महिलांच्या सुरक्षेबाबत समाधान होईपर्यंत नाईट लाईफचं धोरण राबवू नये, असं बजावून सांगत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारचे चांगलेच कान उपटले आहे. हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत तसे आदेश दिले आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाईटलाईफ सुरू करावी यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. नाईटलाईफवरून बराच वाद झाला. महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने स्वत:हून सुओमोटो याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. नाईटलाईफ सुरू करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. पण त्यांनी अगोदर महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेतला का ?, रात्रभर पब आणि मद्याची दुकानं सुरू असतील तर पोलिस यंत्रणेवर येणारा तणाव आणि महिला सुरक्षेबाबत राज्य सरकारने विचार केला आहे का ? असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला केलाय. याबाबत राज्य सरकारने तीन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे. तसंच जोपर्यंत महिलांच्या सुरक्षेबाबत हायकोर्टाचे समाधान होत नाही तोपर्यंत नाईटलाईफ ची अंमलबजावणी करू नये अशी सुचनाही दिलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • VINOD

  THANKS TO HIGH COURT…
  NASTE CHALE NIGHT LIFE MHANE….
  KAAY GARAJ AAHE…..MUMBAI CHE RASTE DURUSTA KARA AGODAR
  NIGHT LIFE MHANJE TARUN MULE GUNHEGARI KADE VALTIL
  BAHER CHYA DESHAT THIK AAHE KARAN TITHE KAYDA KADAK AAHET
  VA MAHILA DEKHIL SURAKSHIT AAHET
  AGODAR KAYDA SUVYAVASTHA HYAMADHE BADAL KARA
  NANTAR NIGHT LIFE CHA VICHAAR KARA!

close