मुंबई पालिकेत पुन्हा राडा, काँग्रेसचे 5 नगरसेवक निलंबित

March 13, 2015 8:46 PM0 commentsViews:

mumbai budget13 मार्च : मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना विरोधात विरोधक काँग्रेस असा चांगलाच संघर्ष पेटलाय. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आजही पालिका सभागृहात गोंधळ घातला. या नगरसेवकांनी सभागृहात चक्क शिट्‌ट्याही वाजवल्या.

याप्रकरणाची गंभीर दखल घेत काँग्रेसच्या सागर ठाकूर, योगेश भोईर, शिवा शेट्टी, ललिता यादव आणि गीता यादव या 5 नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलंय.

यानंतरही दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली आणि शिवसेना-काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये चक्क झटापट झालीय.

महापौरांविरोधात आंदोलन करणार्‍या काँग्रेसच्या 6 नगरसेविकांना कालच 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज 5, अशा एकूण 11 नगरसेवकांना निलंबित करण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close