विषकन्या नव्हे विषपत्नी, पतीला मारण्यासाठी रचना सर्पदंश प्लॅन !

March 13, 2015 10:40 PM0 commentsViews:

wife kill husbendसुनील उंबरे, पंढरपूर

13 मार्च : चित्रपटांमधून आपण विष कन्येच्या अनेक कथा पाहिल्या असतील….पण माळशिरसमध्ये मात्र, एका महिलेने आपल्या पतीला मारण्यासाठी चक्क सर्पमित्रांनाच सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बरं एवढ करूनही तो बिचारा साप तिच्या पतीला चावला नाही म्हणून…तिनेच प्रियकराच्या मदतीने त्याला मारून टाकलं आणि नंतर वरून सर्पमित्रांकरवी त्या सापाला मयताचा चावा घेण्यास भाग पाडलं…विश्वास बसत नाहीना या महाभयंकर कटकारस्थानावर तुमचा…म्हणूनच मग आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

हीच ती कटकारस्थानी पत्नी….जिने आपल्या पतीला चक्क साप चावल्याचा बनाव करून मारलंय. या कटकारस्थानामागची कहाणी देखील मोठी रंजक आहे. गडहिंग्लजचे कृषी अधिकारी प्रकाश सावंत यांची पत्नी लतिका हिचे तिचाच चुलत मामेभाऊ देविदास रणदिवे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. पण तिचा पती त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने, त्यांनी या कृषी अधिकारी प्रकाश सावंत यांनाच साप चावून मारण्याचा प्लॅन केला. त्यासाठी फलटनच्या चार सर्पमित्रांना रितसर सुपारी देखील देण्यात आली.

ठरलेल्या प्लॅननुसार त्यांनी गडहिग्लजलाच प्रकाश सावंताना सर्पदंशाकरवी मारण्याचा करकारस्थानही रचलं पण ते काही कारणास्तव शक्य न झाल्याने त्यांनी पुन्हा माळशिरसमध्येच सावंताना राहत्याघरीच झोपेमध्ये सर्पदंशाकरवी मारण्याचा कारस्थान रचलं पण ऐनवेळी साप काही चावलाच नाही म्हणून मग या महिलेनेच आपल्या प्रियकराच्या साथीनेच आपल्या पतीचं उशीने तोंड दाबून खून केला. आणि वरून हा खून वाटू नये म्हणून सर्पमित्रांना या सापाला पुन्हा त्या मयत पतीलाच चावा घेण्यास भाग पाडलं. पण चाणाक्ष पोलिसांच्या तपासात हा सगळा बनाव अखेर उघड झालाच….

माळसिरस पोलिसांनी या प्रकरणी मयत सावंतांची पत्नी तिचा प्रियकर आणि चार सुपारीबहाद्दर सर्पमित्रांनाही अटक केलीय. पण एकूणच हा सगळा प्रकार म्हणजे विषकन्येपेक्षाही महाभयंकरच म्हणावा लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close