कांदिवलीतल्या क्रांतीनगरमध्ये घुसलेला बिबट्या जेरबंद

September 30, 2009 9:44 AM0 commentsViews: 59

30 सप्टेंबर कांदिवलीत एका व्यक्तीला जखमी करणार्‍या बिबट्याला वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी जेरबंद केलं. कांदिवली पूर्व इथल्या क्रांतीनगरमधल्या लोखंडवाला संकुल इथे सकाळी 4.30 वाजता बिबट्या घुसला होता. सकाळची वेळ असल्यामुळे शांतता होती. त्यानंतर तिथे आलेल्या रिक्षा चालक संजय कुमार याच्यावर त्याने हल्ला केला. त्यात संजय जखमी झाला. त्याची सुटका करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी लाठ्या काठ्याने बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बिबट्या एका रिक्षाखाली जाऊन बसला. नंतर पोलीस आणि वनविभागाच्या अधिकार्‍यांनी त्याला इंजेक्शन दिलं आणि बिबट्याला ताब्यात घेतलं.

close