‘चल, हवा आने दे!’, टाईमपास-2मध्ये दगडू प्रियदर्शन तर प्राजू बनली प्रिया !

March 14, 2015 2:34 PM0 commentsViews:

timepass 214 मार्च : “आई बाबा आणि साई बाबांची शपथ…,प्यापर गळपाटला का….,काजू कतली आणि प्राजू पतली…”अशा एक से एक धमाकेदार डायलॉगने भरपूर असलेला टाईमपास सिनेमा कुणाला माहित नाही…आणि त्यातच दगडू आणि प्राजक्ताची लव्ह स्टोरी तर न विसरणारी…पण अर्धवट राहिलेली ही लव्ह स्टोरी आता पूर्ण होणार आहे कारण टाईमपास -2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा फर्स्ट लूक लाँच झालाय.

1 मे ला रिलीज होणार्‍या टाईमपास 2 या सिनेमाचं गुपित आता उघड झालंय. तरुण दगडूच्या भूमिकेत असणार आहे प्रियदर्शन जाधव आणि प्राजक्ताच्या भूमिकेत आहे प्रिया बापट…’टाइमपास’च्या दुसर्‍या भागात दगडू आणि प्राजक्ता यांची प्रेमकहाणी वयात येणार हे तर सर्वांना माहित होतं, पण त्यांची भूमिका कोण करणार याबद्दल बरीच उत्सुकता होती, बरेच अंदाज वर्तवले जात होते. आज अखेर निर्माते-दिग्दर्शक रवी जाधव यांनी हे रहस्य उघड केलं. प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्यासह टाइमपास 2 चा फर्स्ट लूक आज युट्यूबवर लाँच करण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close