जेव्हा, जितेंद्र आव्हाडांना धमकी आली !

March 14, 2015 4:32 PM0 commentsViews:

राहुल झोरी, मुंबई

14 मार्च : महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा व्यवस्था स्वत:च्या दिमतीला असणे हा आता एक ‘ स्टेट्स सिम्बॉल’ बनत चाललाय. आमदार, खासदार, मुंबईतील मोठे बिल्डर्स या बरोबरच मुंबईतल्या कुख्यात गुंडांनाही मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवावी लागल्याची अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी तर दुसरीकडे या बड्या हस्तींच्या तथाकथीत स्टेटस सिम्बॉलची सुरक्षा देताना यामध्ये मुंबई पोलीस नेमकं काय शहानिशा करतात यासाठी हा खास रिपोर्ट…jitendra avhad fast

जितेंद्र आव्हाड….राष्ट्रवादीचे एक दबंग युवा नेतृत्व….त्यांच्या दबंगगिरीचे अनेक किस्सेही कळवा मुब्रा परिसरात चवीने चर्चिले जातात..असो…तर मंडळी असं हे धडाडीचं ठाणे पंचकृषीतलं राजकीय युवा नेतृत्व…..पण याच दबंग नेतृत्वाला जीवे मारण्याची धमकी आलीय म्हणे….तीही एका साध्या पोस्टकार्डद्वारे….आणि या पोस्टकार्डावरचा मजकूर काय आहे तर म्हणे तुमचा देखील पानसरे करू….थोडक्यात काय या अज्ञात हल्लेखोरांनी आव्हाडांना थेट दाभोलकर आणि पानसरेंच्या पंगतीला नेऊन बसवलंय…हे आम्ही म्हणत नाहीत तर आव्हाड समर्थकांचाच तसा दावा आहे. अर्थात आव्हाडसाहेबांनी मात्र, अशा धमक्यांना आपण अजिबात भीक घालत नसल्याचं म्हटलंय.

आव्हाडांनी ही धमकी किरकोळीत काढली असली तरी महाराष्ट्राच्या सजग पोलीस खात्याने कोणतीही रिस्क नको म्हणून लागलीच आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ केलीय. अर्थात आव्हाडांनी ती नाकारली नाही हा भाग अलहिदा…अर्थात धमकी मिळालेले आव्हाड हे काही एकटेच नेते नाहीयेत. ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनाही अशाच धमक्या आल्यात. पण त्यांना मिळालेल्या धमक्या या रवी पुजारी सारख्या गँगस्टर्सकडून मिळाल्यात तर आव्हांडांना मिळालेही धमकी ही थेट दाभोलकर आणि पानसरेंच्या कथित मारेकर्‍यांकडून आलीय हा फरकही इथं नजरेत भरणारा आहे…बरं,जाऊद्याना आपल्याला काय त्याचं…पण या धमकीसत्रामुळे पोलिसांचं मात्र. काम वाढलंय. पोलिसांनीही पन्नास पैशांच्या पोस्टकार्डवर विश्वास ठेऊन आव्हांडांना सुरक्षा व्यवस्था पुरवली देखील. आता आव्हाडांचे राजकीय विरोधक पोलिसांच्या तत्परतेला पोस्टकार्डद्वारे धमकी पाठवा आणि सुरक्षा मिळवा असं कदाचित हिनवतीलही…अर्थात आव्हाड साहेबही त्यांना भीक घालत नाहीत म्हणा….कारण आव्हांडांसारखी विवेकी विचारांची माणसं अशा गोष्टीकडे मुळीच लक्षं देत नसतात. कारण आहेतच मुळी पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते…आता त्याचे विरोधक त्याला स्वयंघोषित पुरोगामी नेतृत्व असं हिनवतील.म्हणून काय त्याकडे तुमच्या आमच्या सारख्यांनी थोडचं लक्षं द्यायचं असतं.

पण इथं मुळात मुद्दा आहे की..,साध्या पोस्टकार्डाचा आधार घेऊन लागलीच सुरक्षा कशी काय पुरवतात त्याचेही काही निकष असतीलच की…आता आपण एखाद्याला धमकी आल्यानंतर पोलिसांनी संबंधीताला सुरक्षा पुरवण्याचे नेमके काय निकष आहेत ते माजी पोलीस अधिकार्‍यांनी सांगितलं.

एखाद्या व्यक्तीनंतर पोलिस सुरक्षा घेतल्यानंतर, गुप्तचर विभागाकडून धमकीच्या सत्यतेची पडताळणी करण अपेक्षित आहे आणि या पडताळणी दरम्यान, धमकी बोगस असल्याचं निष्पन्न झालं तर पोलीस त्याची तात्काळ त्याची सुरक्षा व्यवस्था काढून घेऊ शकतात पण बहुतांश प्रकरणात कधीच अशी पडताळणी होत नाही कारण बहुताश नेतेमंडळी ही केवळ स्टेट्स सिम्बॉलसाठी हा सुरक्षेचा लवाजमा घेऊन फिरत असतात…अर्थात आपले आव्हाड साहेब अशातले अजिबात नाहीत बरं…कारण हे नेतृत्वच मुळी स्वयंभू आहे. त्यामुळे त्यांची सटकली तर ते एका झटक्यात ही सुरक्षा व्यवस्था नाकारू शकतात. म्हणूनच आव्हाडसाहेबांच्या विरोधकांना तुम्ही उगाचच त्यांना डिवचू नका बरं….नाहीतर महाराष्ट्रातल्या आणखी एका पुरोगामी नेतृत्वाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर यायचा…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close