देवस्थळी मायलेकींना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा

September 30, 2009 10:52 AM0 commentsViews: 7

30 सप्टेंबर पुण्याच्या डॉ. महाजन हत्याकांडातील आरोपी देवस्थळी मायलेकींची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टानं रद्द केली आहे. त्यांना फाशीऐवजी आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुण्याच्या डॉ. दिपक महाजन यांचा 2006 मध्ये या दोघी मायलेकींनी अपहरण करुन अत्यंत निघृणपणे खून केला होता. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करुन कात्रजच्या घाटात त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही केस दुर्मिळात दुर्मिळ ठरवून पुणे सेशन कोर्टाने या मायलेकींना फाशीची शिक्षा सुनावली होती.

close