महायुतीत राहायचं की नाही ?, ‘स्वाभिमानी’ची कार्यकारिणी बैठक

March 14, 2015 6:32 PM1 commentViews:

raju_shetty14 मार्च : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दोन दिवसांची राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात होतेय. यात महायुतीत राहायचं की नाही याविषयी चर्चा होणार आहे. त्यामुळे राजू शेट्टी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

या दोन दिवसांच्या कार्यकारिणीत पहिल्या दिवशी भूसंपादन विधेयक तसेच राज्यात दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि सरकारी मदत या दोन विषयांवर चर्चा होणार आहे.

या बैठकीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे फोनवरून सहभागी होणार आहेत. तर उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलनं आणि आगामी राजकीय वाटचाल याविषयी चर्चा होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Mt Pandurang

    quit from mahayuti . It will be the better for farmers, for maharashtra.

close