अमरावतीतून राष्ट्रपतींचे फोटो हटवण्याची मागणी

September 30, 2009 10:57 AM0 commentsViews: 1

30 सप्टेंबर अमरावती शहरातून राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे फोटो हटवावेत, अशी मागणी महापौर अशोक डोंगरे यांनी केली आहे. महापौर काँग्रेसचेच असल्यानं त्यांच्या मागणीमुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रपतींचा मुलगा रावसाहेब शेखावत अमरातीतून निवडणूक लढवतायत. राष्ट्रपतींच्या फोटोमुळे आचारसंहितेचा भंग होतो, असा डोंगरे यांचा दावा आहे. शिवाय, मुलगाच रिंगणात असल्यानं राष्ट्रपतींच्या फोटोचा मतदारांच्या मनावर परिणाम होत आहे, असं महापौरांनी म्हटलं आहे. यावर रावसाहेब शेखावत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

close