चॅम्पियन्स ट्रॉफीतलं भारताचं भवितव्य बुधवारी ठरणार

September 30, 2009 11:44 AM0 commentsViews: 2

30 सप्टेंबर चॅम्पियन्स ट्रॉफीत भुधवारी भारतासाठी सर्वात महत्वाची मॅच असणार आहे. वॉण्डरर्सवर भारत आणि वेस्ट इंडिज एकमेकांना भिडणार आहेत. स्पर्धेत सलग दोन मॅच गमावल्यानं वेस्ट इंडिजचं स्पर्धेतलं आव्हान याआधीच संपुष्टात आलंय. पण भारतासाठी सेमीफायनल गाठण्याची ही शेवटची संधी आहे. भारतीय टीमला नुसतंच जिंकावं लागणार नाहीये तर रन रेट वाढेल इतक्या मोठ्या फरकानं ही मॅच जिंकावी लागणार आहे. तर दुसर्‍या बाजुला ऑस्ट्रेलिया वन डे क्रमवारीत त्यांचं नंबर वनचं स्थान परत मिळवण्यासाठी आतूर आहेत. महत्वाचं म्हणजे दक्षिण आफ्रिका स्पर्धे बाहेर गेल्यानं त्यांना एक नामी संधी चालून आली आहे. मिनी वर्ल्ड कप समजली जाणरी चॅम्पियन्स ट्रॉफी आता चांगलीच रंगतदार होत आहे. लीग मॅच आता अंतिम टप्प्यात पोहचल्यात यानंतर चार बलाढ्य टीम्स सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. यातलीचं एक टीम ठरणार आहे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स.

close