पद्मसिंहांना अटकपूर्व जामीन मंजूर

October 1, 2009 9:57 AM0 commentsViews: 4

1 ऑक्टोबर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट रचण्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात पद्मसिंह पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्याअर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. काही दिवसांपूर्वी अण्णा हजारेंनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अण्णा हजारेंनी पद्मसिंह पाटलांवर केला होता. पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणातला आरोपी सतीश मंदाडेच्या घरी हा कट रचण्यात आला, असा आरोप याप्रकरणी करण्यात आला आहे.

close