मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याबाबत वक्तव्य न केल्याचा नारायण राणेंचा लेखी जबाब

October 1, 2009 10:10 AM0 commentsViews: 9

1 ऑक्टोबर मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे राजकीय व्यक्तींचा हात असल्याचा आरोप महसूल मंत्री नारायण राणे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर, मी तसं बोललोच नाही,असं घुमजाव नारायण राणेंनी केलं आहे. राणेंनी कोर्टात सादर केलेल्या जबाबात आपण कोणत्याही व्यक्तीला उद्देशून असं बोललो नव्हतो असा दावा केला आहे. नारायण राणेंचा हा लेखी जबाब आयबीएन लोकमतला उपलब्ध झाला. नारायण राणेंनी सादर केलेला हा जबाब मात्र कोर्टानं फेटाळला आहे. तसंच त्यांना नोटीसही बजावली. पण कोर्टानं बजावलेल्या नोटीसा राणे यांनी स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर यापूर्वीच कोर्टानं संताप व्यक्त केला. तसंच एकतर्फी निकाल देण्याचा इशाराही दिला होता.

close