सिद्धराम म्हेत्रेंना अटक होण्याची शक्यता

October 1, 2009 10:16 AM0 commentsViews: 1

1 ऑक्टोबर अक्कलकोट-शेगाव गोळीबार प्रकरणी काँग्रसचे उमेदवार सिद्धराम म्हेत्रे यांना अटक होण्याची शक्यता आहे. जिल्हा कोर्टाने जामीन फेटाळल्यानं म्हेत्रेंना कधीही अटक करू असं पोलिसांनी म्हटलं आहे. तर जामिनासाठी हायकोर्टात जाण्याचं म्हेत्रेंनी ठरवलंय. म्हेत्रेंवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या शेगावमधल्या सभेत हा गोळीबार केला होता. त्यात 1 ठार तर 3 जखमी झाले होते.

close