एअर इंडियाची विमानसेवा सुरळीत

October 1, 2009 10:20 AM0 commentsViews: 2

1 ऑक्टोबर एअर इंडियाची विमानसेवा 90 टक्के सुरळीत झाल्याच एअलाईन्सच्या सूत्रांनी सांगितलं आहे. एअर इंडिया पायलटस्‌नी पुकारलेला संप काल पाचव्या दिवशी मिटला. तसंच प्रॉडक्टिव्हिटी लिंकड् इन्क्रिमेंटमधली घट ही सर्व कर्मचार्‍यांसाठी लागू असेलअसं एअर इंडिया बोर्डानं स्पष्ट केलं आहे. एअर इंडियाला आर्थिक संकटातून बाहेर यायचं असेल तर थोडीफार घट ही करावीच लागेल. असं कंपनीनं म्हटलंय. महत्वाच्या फेरबदलाशिवाय एअर इंडियामध्ये सुधारणा होऊ शकणार नाही. त्यामुळे पुनर्रचनेचा विचार कोणत्याही परिस्थितीत बदलला जाणार नाही असंही बोर्डानं म्हटलं आहे.

close