फ्रान्सिस गोम्सला न्यायालयीन कोठडी

October 1, 2009 11:35 AM0 commentsViews: 4

1 ऑक्टोबर फ्रान्सिस गोम्सला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याने आपल्या मुलींना तब्बल सात वर्षं कोंडून ठेवलं होतं. आपल्या मुली बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर कुणीतरी बलात्कार करेल, अशी भीती असल्यानं आपण मुलींना कोंडलं, असं त्याचं म्हणणं आहे. पण, प्रत्यक्षात मात्र फ्रान्सिस आपल्या मुलींना आणि आपल्याला रोज मारहाण करतो आणि उपाशी ठेवतो, असं त्याच्या पत्नीनं सांगितलं. एका NGO कार्यकर्त्याच्या आणि शेजार्‍यांच्या मदतीनं त्याच्या पत्नी आणि मुलींची सुटका होऊ शकली. फ्रान्सिसविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला गेला.गुरूवारी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

close