अखेर राष्ट्रवादीने अविश्वासदर्शक ठराव मांडला, भाजपचा पाठिंबा ?

March 16, 2015 3:59 PM0 commentsViews:

ncp and bjp 4416 मार्च : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादीनं अखेर अविश्वास ठराव मांडलाय. राष्ट्रवादीने ठराव मांडल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी एकच गोंधळ घातलाय. ठरावावर चर्चा सुरू असून त्यावर आज मतदान होणार आहे. सभापतीपदाच्या अविश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहणार आहे. शिवसेनेचं मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा शक्यता आहे.

अविश्वास ठरावाच्या वेळी मतदानासाठी सर्व राजकीय पक्षांनी व्हीप जारी केलाय. मतदानावेळी सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश सर्व पक्षांनी दिले आहेत. विशेष म्हणजे,सभापतींविरोधात अविश्वास ठरावावर मतदान होण्याची विधिमंडळ इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक झाली, पण त्यात कोणताच मार्ग निघाला नाही. अविश्वास ठरावावर मतदान होण्याआधी सभापतींनी राजीनामा द्यायचा नाही, यावर काँग्रेस ठाम आहे. पण रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव सभापतीपदासाठी निश्चित झाल्याचं समजतंय. उपसभापती पदासाठी भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांचे नाव आघाडीवर आहे. पण फुंडकर यांनी नकार दिलाय. उपसभापतीपेक्षा मंत्री होण्याची फुंडकर यांची इच्छा असल्याचं समजतंय. परिषद सभापतीपदासाठी भाजप-राष्ट्रवादी युती होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेत पक्षीय बलाबल

 सदस्य संख्या विधान परिषद 78, बहुमतसाठी 40 मत अपेक्षित

राष्ट्रवादी काँग्रेस – 28
काँग्रेस 21
भाजप 12
शिवसेना 07
लोकभारती 01
पी डब्लू पी 01
रिपाई 01
अपक्ष 07

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close