भाजप-राष्ट्रवादी छुपी युती झाली कळलंच नाही-कदम

March 16, 2015 5:50 PM0 commentsViews:

Ramdas kadam V16 मार्च : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अविश्वास ठराव मांडलाय. पण या अविश्वासदर्शक ठरावावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला.

भाजप आणि राष्ट्रवादीची गुपचूप युती कशी झाली हे आम्हाला कळलंच नाही, असा टोला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी लगावला. तसंच राष्ट्रवादीला घाई का झाली हे कळत नाही, असं खोचक सवालही कदम यांनी केला.

रामदास कदम यांनी एका प्रकारे भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा आहे का ? असा सवालच केला. त्यामुळे कदमांना भाजपचे नेते गिरीश बापट यांनी जशाच तसे उत्तर दिलंय. रामदास कदम यांना सेनेत काय चाललंय ते कळत नाही, तर इथं काय चाललंय, ते कसे कळेल, असा टोला बापट यांनी लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close