या बंडखोरांनो परत फिरा रे : शरद पवारांचं आवाहन

October 1, 2009 1:17 PM0 commentsViews: 6

1 ऑक्टोबर बंडखोरांनी जनाची नाही तरी मनाची लाज राखत पक्षात परतावं, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. नागपूरमधल्या हिंगणा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश बंग यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी गुरूवारी सभा घेतली. एनरॉन प्रकल्पाबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्य दहा वर्षं अंधारात गेलं, असा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून 120 हून अधिक बंडखोर उमेदवार विविध विधानसभा मतदार संघात उभे आहेत. गोपीनाथ मुंडेनीही आघाडी फक्त कागदावरच असल्याची टीका केली होती.

close