आष्टी प्रकरणाची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

October 3, 2009 9:24 AM0 commentsViews: 37

3 ऑक्टोबर आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याच्या प्रकरणाची मुख्य निवडणूक आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे निर्देश बीड पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानुसार बीड पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या घटनेचं शूटिंग ज्या मोबाईलद्वारे करण्यात आलं, तो मोबाईल मेमरी कार्डसह पोलिसांनी दप्तरजमा केला आहे. पुढील तपासणीसाठी तो बंगळुरूच्या फॉरेन्सिक लॅबॉरेटरीमध्ये पाठवण्यात येणार आहे तसेच याप्रकरणी बीड पोलिसांनी आयबीएन लोकमतच्या आफिसला भेट देऊन जबाबही नोंदवला. पैसे वाटणार्‍या अनुरथ सानप, संजय नवले आणि अंकुश धस या राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर बीड पोलिसांनी गुन्हाही नोंदवला आहे.

close