गुप्त आणि सुप्त राजकारण बाहेर आलं -देशमुख

March 16, 2015 11:19 PM0 commentsViews:

deshmukh443416 मार्च : अविश्वासदर्शक ठरावाच्या मतदानामुळे राष्ट्रवादी आणि भाजपाचं सुप्त आणि गुप्त प्रकारचं राजकारण देखील महाराष्ट्रासमोर उघड झालंय अशी खरमरीत टीका शिवाजीराव देशमुख यांनी केलीये.

तसंच मी काँग्रेसवर 40 वर्षांपासून प्रेम करणार नेता आहे. गेली 11 वर्ष मी सभापती होतो. आणि जे योग्य काम आहे आणि अचूक आहे ते काम करण्याची भूमिका होती. या अविश्वास ठरावाला सामोरं जाण्यासाठी मला कोणतंही दु:ख झालं नाही अशी भावना देशमुख यांनी व्यक्त केली.

आज या ठरावामुळे सामोरं गेल्यामुळे गुप्त आणि सुप्त प्रकारचं राजकारण समोर आलंय अशी टीकाही त्यांनी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close