राष्ट्रवादीचाही मनमोहन सिंग यांना पाठिंबा

March 17, 2015 12:01 PM0 commentsViews:

NCP WITH EX PM

17 मार्च : कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना आरोपी म्हणून समन्स बजावल्यानंतर काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सर्व खासदारांसह आज (मंगळवारी) मनमोहन सिंग यांची भेट घेतली आहेत.

मनमोहन सिंह हे प्रामाणिक आहेत, त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव आहे. या प्रकरणात त्यांना गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी यापूर्वी दिली होती. त्यानंतर पवार यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर, विजयसिंह मोहिते पाटील, वंदना चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांनी आज मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी तुमच्या पाठिशी असून, आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणात मनमोहनसिंग यांना समन्स बजाविल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मनमोहनसिंग यांना काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले होते. सोनिया गांधी यांनी सर्व प्रमुख नेत्यांसह मनमोहनसिंग यांच्या समर्थनार्थ पदयात्रा काढली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close